कस सांगू

…….मुलगी झाली हो……
शाळा हे असं पवित्र स्थान आहे जिथे लहानपणापासून मुलं वेगवेगळे विषय हाताळतात.नवनवीन गोष्टी,खेळ, सांस्कृतिक कार्यक्रम, भूगोल, गणित, इतिहास, सामान्य विज्ञान असे अनेक विषय हळूहळू आपल्या ओळखीचे होऊ लागतात. त्या प्रत्येक विषयाचे महत्त्व आपल्या दैनंदिन जीवनात किती महत्त्वाचे आहे हे सुद्धा शाळेची पहिली पायरी चढली की कळू लागते.
शाळेचे दप्तर त्यात वेगवेगळ्या विषयांची पुस्तके आपले ज्ञान वाढवण्यात महत्वाची भूमिका निभावत असतात.जीवाभावाच्या मित्र मैत्रिणींची ओळख सुध्दा आपल्याला शाळाचं करून देते.मिळूनमिसळून राहणे, एकमेकांना मदत करणे,आपल्या वस्तू पेन, पेन्सिल अश्या अनेक शेअर करणे ,समाज कार्य , स्वःताच्या शरीराची निगा राखणे, योग्य आहार असे अनेक उपयुक्त मार्गदर्शन करणारे विषय शाळा हाताळत असते.
असाच एक विषय सायन्स.. सामान्य विज्ञान माझा अतिशय आवडीचा विषय.तसे सर्वच विषय एकमेकांना बांधून ठेवतात.
आजही आठवतंय सामान्य विज्ञान पुस्तकातील कुंडीतील लागवड विषयावरील तो धडा आणि छोट्या प्लास्टिकच्या भांड्यात धने पेरून कोथिंबीर कधी उगवणार याची वाट पाहणारी मी.
एखाद छोट रोप मोठं करताना त्याची योग्य निगा राखवी लागते,वेळोवेळी पाणी,खत,योग्य प्रमाणात सुर्य प्रकाश मिळणे अश्या अनेक गोष्टी एक निरोगी रोप वाढायला आवश्यक असतात आणि पुढे ते मोठे झाल्यावर देखील त्याचा तशाच पद्धतीने सांभाळ केला तर मोठी झालेली झाड आपल्यात एक वेगळंच आनंद देणारे नातं निर्माण करतात.लहान रोपाचं रूपांतर जसं योग्य देखरेख करून झाडात होत आणि मग त्या झाडावरची टवटवीत फुले आपल्याला आकर्षित करतात तसंच काहीसं लहानाचे मोठे होत असताना प्रत्येक टप्प्यावर आपणही आपल्या शारीरिक जडणघडणाकडे लक्ष देणे गरजेचे असते.
सायन्स रोजच्या दैनंदिन जीवनात उपयोगी पडत हे ह्या छोट्याश्या प्रयोगानी मला समजू् लागले.
आम्ही शिकत असताना मोबाईल वापर तेवढा नव्हता. मोबाईलवर भरपूर माहिती विविध विषयांवर आजकाल सहज उपलब्ध होते.आजकालच जग हे इंटरनेटच आहे.अगदी लहान मुलांपासून ते अगदी वयस्कर लोकांपर्यंत मोबाईल हा अविभाज्य घटक बनताना दिसत आहे.अर्थात प्रत्येक गोष्टीत फायदा तोटा हा असतोच.
आमच्या लहानपणी पुस्तकं आमचा खरा दोस्त होता.पुस्तक वाचन करून ज्ञानात भर पडायची.
आता कसं एखादी माहिती मिळवायची तर नेटवरुन पटकन आपण ती आत्मसात करु शकतो.
परवाच मी आणि माझ्या शाळेच्या मैत्रिणी खूप वर्षांनी एकत्र जमलो होतो. सगळ्यांच पन्नाशी उलटलेल्या त्यामुळे विषय एकदम निराळेच.सासू,सून, मुलांची लग्न आणि सर्व काही झाल्यावर एक मैत्रीण म्हणाली आजकाल गुडघे दुखायला लागलेत.आता हळूहळू पन्नास वय बोलू लागलयं.एक म्हणाली हो ग खरंय मला देखील मेनोपाॅजचा त्रास होतोय.आज देखील ह्या वयाला ह्या विषयावर आम्ही मैत्रिणी इतक्या मोकळे पणाने बोलण्यास उत्सुक नव्हतो.
घरी आल्यावर माझ्या मनात विचार येऊ लागले मुलगी,आई,बायको,सून,सासू, भूमिका निभावत असताना त्या त्या भूमिका साकारत असताना महिलांच्यात शारीरिक,मानसिक बदल देखील होत असतात.नैसर्गिक जडण घडणांना महिला वर्ग सामोरे जातात .
पूर्वी शाळेच्या पाठ्यपुस्तकातून कुमार अवस्थेत मुलामुलींच्यात होणारे शारीरिक बदल ह्यावर फार कमी माहिती दिली जात होती. मोकळेपणाने ह्या विषयावर विशेष कधी बोलले जात नव्हते.वयानुसार गोष्टींची जाण व्हायला पाहिजे हा त्या पिढीचा अट्टाहास होता .आणि आम्हाला सुध्दा ते काही प्रमाणात आज देखील बरोबर वाटते.
इंटरनेटमुळे लहान वयातच मुलं खूप काही माहिती गोळा करतात.त्यांची जिज्ञासू वृत्ती ह्यातून उदयाला येते.आजकाल शाळांमधून पाठ्यपुस्तकातून कुमारअवस्था,adolescence age ह्या बद्दल माहिती दिली जाते.योग्य वयात योग्य माहिती असणे गरजेचे असते. आमच्यावेळेस ना इतकी माहिती आम्हाला हया विषयावर होती ना आम्ही कधी ह्या विषयावर कोणाशीही आपणहून चर्चा केली.मुलमुली वयात येतात म्हणजे नेमके काय ह्या विषयाची खरोखरच जुजबी माहिती आम्हाला होती आणि लाजे खातर कोणाला विचारण्याचे आम्हा मुलींच्यात तेवढे त्या वेळी बळ नव्हते.आजकाल मुलींना मातृत्व,मासिक पाळी, रजोनिवृत्ती म्हणजे menopause ह्या बद्दल माहिती असते.पण तरीदेखील तितक्या मनमोकळेपणाने त्या बद्दल बोलले जात नाही.
त्याकाळात घेण्यात येणारी काळजी,स्वच्छता ,मानसिक बदल,जर चिडचिड होत असेल, थकवा जाणवत असेल तर उपाय योजना ह्यां विषयीची सर्व माहिती उपलब्ध होऊ शकते.योग्य आहार ,आराम सर्व माहिती असणे आवश्यक असते.मुल कितव्या वर्षी होण योग्य आहे.अश्या अनेक गोष्टी रजोनिवृत्तीत होणारे शारीरिक बदल,वेळोवेळी डॉक्टरांचे मार्गदर्शन कसे घ्यावे ज्यामुळे आपण आपली प्रकृती निरोगी ठेवू शकू.
प्रत्येक गोष्टींची सविस्तर माहिती खाली दिलेल्या लिंकवर क्लिक केल्यावर आपल्याला मिळू शकते.काही शंका,काही गैरसमज,समज दूर करण्यासाठी केलेले प्रयत्न म्हणजे सात्विक रितू साईट.तुम्ही सर्वांनी ह्या साईटवर जाऊन उपलब्ध माहिती दिली आहे ती अवश्य जाणून घ्या.हया साईटवर डॉक्टरांनी दिलेले सल्ले तसेच पाळी, बाळंतपण,रजोनिवृत्ती हया सर्व गोष्टींबद्दलच्या शंकाचे समाधान तुम्हाला नक्कीच मिळेल ह्याची मला आशा आहे मी देखील ह्या वरील माहिती ह्या साईटवर वाचली आणि जाणवलं की आमच्या वेळी अशी माहिती उपलब्ध असती तर आम्हाला देखील वेळेवर माहिती मिळण्यास मदत झाली असती.अवश्य भेट द्या सात्त्विक रितू साइट ला ..
धन्यवाद
मेघना बापट.

Blog By:

 Mrs Meghana Bapat

Scroll to Top